बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार

Foto
कन्नड, (प्रतिनिधी): तालुक्यातील हतनूर येथे शुक्रवारी (ता. ३१) रात्री बिबट्यानी शेतकरी एकनाथ काशिनाथ डोळस यांच्या गोठ्यावर हल्ला करून एका कालवडीला ठार केले. या घटनेमुळे शेत वस्तीवरील शेतकऱ्यात भिती निर्माण झाली आहे. 

गोठ्यात बांधलेल्या इतरही पाळीव प्राणी होते, ती सुरक्षित राहिले आणि एका कालवडीवर बिबट्यांनी हल्ला केला.
 बिबट्यांनी हतनूर येथील चिकलठाण रस्ता जवळील मगर पाणंद रस्ता लगट गट क्रमांक ३५५ मधील गोठ्यात सात फूट गेटवरून उडी मारून कालवडीला गोठ्यात तिचा फडशापाडला.

शेतकरी एकनाथ डोळस यांच्या ही घटना सकाळी लक्षात आली. बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार झाली. या घटनेची माहिती मिळताच प्रादेशिक वन विभागाचे वनपाल कैलास जाधव तातडीने दाखल झाले. यांनी कारवाई करत पंचनामा केला. शेतकरी एकनाथ डोळस यांनी सांगितले की, परिसरात बिबटे आणि त्यांची बछडे नेहमीच फिरत असतात. या परिसरात बिबटे आणि बछड्यांचा वावर आहे. यामुळे रात्री प्रवास करणे आणि शेतातील कामे करणे धोकादायक झाले आहे. पिंजरा लावून बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.